Ad will apear here
Next
‘एससीडब्ल्यूईसी’च्या परिषदेवर संगीता ललवाणी यांची नियुक्ती
संगीता ललवाणीपुणे : पुण्यातील प्रसिद्ध महिला उद्योजक संगीता ललवाणी यांची सार्क चेंबर वूमन आंत्रप्रेन्य़ुअर्स काऊन्सिल (एससीडब्ल्यूईसी) या संस्थेने आपल्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.

‘एससीडब्ल्यूईसी’ ही ‘सार्क चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ या संस्थेचा एक भाग असून, दक्षिण आशियातील महिलांना सक्षम होण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यामधून अधिकाधिक उद्योजक घडविणे, हे या संस्थेचे उद्दिष्ट्य आहे.

‘सार्क चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या महासचिव हीना सईद यांनी संस्थेतर्फे ललवाणी यांना पाठविलेल्या नियुक्तीपत्रात ललवाणी यांनी आतापर्यंत संस्थेसाठी केलेल्या कामाची प्रशंसा केली आहे. 

‘‘एससीडब्ल्यूईसी’सारख्या महत्त्वाच्या संस्थेच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेचे सदस्यत्व प्राप्त होणे हा मोठा सन्मान आणि तितकीच मोठी जबाबदारी आहे. महिलांमध्ये उपजतच उत्साही आणि मेहनती वृत्ती, तसेच धडाडी असते. उद्योजक होऊ पाहणाऱ्या महिलांना योग्य वेळी मदतीचा हात मिळाला, तर त्या खूप चांगली कामगिरी करू शकतात. आता सार्क चेंबर वूमन आंत्रप्रेन्युअर्स काऊन्सिलमध्ये अधिक चांगले काम करून दाखवण्याचा माझा निर्धार आहे,’ अशी प्रतिक्रिया ललवाणी यांनी व्यक्त केली.  

ललवाणी या महिला सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या विविध व्यासपीठांशी निगडित असून, त्यांनी नुकतेच ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या (फिक्की) पुणे महिला शाखेचे अर्थात ‘फ्लो-पुणे’चे अध्यक्षपदही भूषवले होते.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZIRCC
Similar Posts
‘प्रत्येक स्त्रीला मैत्रिणी हव्यातच’ पुणे : ‘आपण महिला अनेक गोष्टी मनात ठेवत असतो, या सर्व गोष्टी वेळच्या वेळी व्यक्त झाल्या नाहीत, तर त्याचा आपल्याच आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे प्रत्येक स्त्रीला मन मोकळे करण्यासाठी मैत्रीणी असणे गरजेचे आहे,’ असे मत प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
‘फ्लो’च्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी संगीता ललवाणी पुणे : ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ची (फिक्की) महिला शाखा असलेल्या ‘फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘फ्लो’ या संस्थेच्या पुणे विभागाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योजिका संगीता ललवाणी यांची निवड करण्यात आली आहे.
महिला बचत गटांसाठी ‘घरोबार’चे व्यासपीठ पुणे : ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण व्हावे, बचत गटांतील महिलांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या लेडीज ऑर्गनायझेशन अर्थात ‘फिक्की फ्लो’ संस्थेच्या वतीने ‘घरोबार डॉट कॉम’चे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे
‘ग्रामीण भागातील महिला आजही हक्कांपासून वंचित’ पुणे : ‘महिलांचा जागर, त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान, त्यांना समान स्थान हे चित्र बहुतांशी वेळा आपल्याला शहरी भागातच दिसते;पण ग्रामीण भागातील महिला आजही घराबाहेर पडू शकत नाही. त्यांना शिक्षणाचं, विचाराचं स्वातंत्र्य नाही. विशेषतः दलित महिला आजही मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत,’ अशी खंत प्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांनी येथे व्यक्त केली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language